34 वर्षांनंतर 1991 चा दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलला मळा  नेहरु विद्यालय सोमपूर येथे भरला 34 वर्षानंतर दहावीचा वर्ग.
1 min read

34 वर्षांनंतर 1991 चा दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलला मळा नेहरु विद्यालय सोमपूर येथे भरला 34 वर्षानंतर दहावीचा वर्ग.

Loading

34 वर्षांनंतर 1991 चा दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलला मळा

नेहरु विद्यालय सोमपूर येथे भरला 34 वर्षानंतर दहावीचा वर्ग.

सटाणा(मनिलाल शिंपी)सन 1991 या वर्षातील इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी तब्बल 34 वर्षानंतर एकत्र आले नेहरू विद्यालय सोमपूर येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गुरुवर्य तसेच शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा यांनी साकारला ते आमचे गुरुवर्य कलाशिक्षक माननीय यु.आर. भांमरे सर यांनी पुष्पहार अर्पण केला नंतर हॉलमध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमासाठी मां.प्रसाद दादा सोनवणे सरपंच क्रंतीताई भामरे शिक्षक श्री आर बी धोंडगे सर,श्री यू आर भामरे सर,डी,आर देवरे सर सुभाष अण्णा ,अभिनव शाळेच्या अध्यक्ष श्रीमती पुष्पा भामरे व केदारे मामा ई.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूल कमिटीचे चेअरमन मा. सुभाष अण्णा भामरे यांनी स्वीकारले नंतर दिवंगत विद्यार्थी व शिक्षक यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली नंतर आलेल्या सर्व गुरुजन व मान्यवर यांचा ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. आमचे सहकारी विद्यार्थी मां.प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र शासनाच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रुप तर्फे धोंडगे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रशांत भामरे यांनी सर्व महिला(विद्यार्थिनी)यांना स्नेहभेट म्हणून पर्स वाटप केली.सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व परिचय करून दिला तसेच श्री नंदलाल भामरे यांनी आपल्या भाषणात गुरुजनांचे कार्य तसेच जुन्या आठवणींना उजळा दिला शिक्षकांनी नेहरू विद्यालय सोमपूर या शाळेत केलेल्या कार्याचा गौरव केला
मा श्री.धोंडगे सर यांनी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इंग्रजी अध्यापनात केलेल्या कार्याला उजाळा दिला
यु. आर भामरे सर यांनी स्काऊट,कला मराठी या विषयात विद्यार्थ्यांना भरभरून केलेले अध्यापन याचा उदघोष केला
मां. डी.आर देवरे सर यांच्या खेळ समाजशास्त्र या विषयातील व नेहरू विद्यालय सोमपूर येथील कामाचे कौतुक केले.तसेच दिवंगत शिक्षक कै.बी.एल भामरे., कै.व्ही के देवरे कै.डी.डी.देवरे., कै. के.डी.भामरे, कै.एन जी भामरे, कै. काकुळते सर यांच्या कार्याला उजाळा दिला.नंतर प्रमोद भामरे यांनी व क्रांती भामरे यांनी आपल्या मनोगतातून शाळेतल्या आनंददायी आठवणींना उजाळा दिला.आदरणीय गुरुवर्य मा.धोंडगे सर,यू आर भामरे सर, डी आर देवरे सर,केदारे मामा यांनी आशीर्वाद पर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संस्काराचे धडे दिले सर्व विद्यार्थी मिळून शाळेला आठ व्हाईट अँड ग्रीन बोर्ड भेट दिले त्यांचे उद्घाटन गुरुजनांच्या हस्ते केले.नंतर सर्व मान्यवर व ग्रुप सदस्य यांनी भोजन केले.एकूण 22 विद्यार्थी उपस्थित होते प्रमोद भामरे,प्रशांत भामरे,राजेंद्र भामरे,अनीलभामरे,मुकेश भामरे ,नंदलाल भामरे,अमोल भामरे,दीपक भामरे शरद भामरे,राजेंद्र पवार,राजू गायकवाड प्रमोद पानपाटील,अनिल बेडीस पुष्पा भामरे, क्रांती भामरे,वैशाली भामरे,अल्का भामरे,सुरेखा भामरे,प्रतिभा गायकवाड,संगीता भामरे,संगीता बच्छाव,सुनीता नाहीरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते ग्रुप चर्चा करून एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगून पुन्हा भेटू असे ठरऊन आनंदाने समारोप केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद भामरे प्रमोद भामरे नंदलाल भामरे यांनी प्रमुख भूमिका बजावली
सर्व ग्रुप तर्फे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड वक्ते मां.प्रशांत भामरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *