साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
1 min read

साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

Loading

साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

 

गुरूळी ( कैलास मठ): जगातील सर्व धर्मग्रंथ हे मनुष्य जातीच्या कल्याणासाठी असून साधुसंतांच्याद्वारे ह्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा प्रसार होत असतो. कोणताही धर्म हा अधर्म करा , अन्याय करा,अनितीने वागा अशी शिकवत देत नाही. आहार, विहार ,आचार ,विचार याचे ज्ञान गीतेतून दिले जाते. धर्माची धारणा करणे व धर्माने वागणे तसेच शेवटचा दिवस गोड म्हणजे मोक्षप्राप्ती होण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान महत्वाचे आहे. मनुष्य जन्माचे पृथ्वी वरील प्रयोजन म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे. कलियुगात धनसंचय केल्यापेक्षा दान धर्म करावा. सत्ययुगात ध्यानाला, श्रीराम युग म्हणजे त्रेता युगात यज्ञाला, श्री भगवान श्रीकृष्ण युग म्हणजे द्वापार युगामध्ये ज्ञानाला, तर कलियुगामध्ये दानधर्माला,खूप महत्त्व आहे. संत तुकाराम महाराजह्यांचे अभंग, माऊलींची ज्ञानेश्वरी ह्यासारखे अनेक संतांचे साहित्य हे जीवनातील रहस्य शिकवितात. साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार, डॉ. रवींद्र भोळे येथे व्यक्त केले. येथे ह भ प शांताराम गिरी महाराज यांच्या प्रेरणेने महाशिवरात्रीच्या अमृत योगा निमित्ताने महाशिवरात्रि सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम कार्यक्रमाचे आयोजना येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे (दिल्ली हिंदू रत्न पुरस्कार विजेते) यांनी प्रवचनात वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी पुढे आपले मत व्यक्त करताना डॉ.रवींद्र भोळे म्हणाले की कलियुगामध्ये अध्यात्म हीच विद्या मनुष्याचा तारणहार ठरू शकते. यासाठी गीता ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे साधुसंतांचे अभंग यांचे वाचन, चिंतन करून ज्ञान आत्मसात करून बोधघेण्याचा प्रयत्न करावा. पुरंदरच्या या पवित्र भूमीमध्ये व अनेक साधुसंतांचे वास्तव्य लाभलेल्या या पवित्र भूमीमध्ये सर्व मंदिरांचे सोशल, अध्यात्मिक ऑडिटिंग केल्यास तालुका पुरंदर हा जगाच्या नकाशावर येऊ शकतो. याप्रसंगी अनेक मान्यवर साधू संतांची कीर्तने प्रवचने झाली. प्रामुख्याने तानाजी महाराज खेडेकर गुरोळी, बाळासाहेब महाराज गायकवाड वाघापूर, हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार उरुळी कांचन, महादेव महाराज खराडे, केरुजी महाराज चव्हाण, मुक्ताबाई के चव्हाण महाराज, वच्छला ताई मोडक, वडकी पुणे यांची प्रवचने झाली. त्याचप्रमाणे चौरे महाराज भांबुर्डे, आखाडे महाराज कासुर्डी, गोरख महाराज सुतार आंबी, मोहिनी ताई मुळीक बारामतीकर, कन्हैयालाल महाराज आळंदी, आकाश गवते महाराज आळंदी, अलकाताई वाल्हेकर नसरापूर, चैतन्य महाराज शिंदे लोणी काळभोर, यांची कीर्तने झाली. याप्रसंगी, दत्तात्रय बबन खेडेकर, पांडुरंग विनायक खेडेकर, परशुराम साहेबराव खेडेकर उपसरपंच, बापू मार्तंड खेडेकर, रामचंद्र यशवंत खेडेकर माजी सरपंच गुरूळी,दीपक सदाशिव खेडेकर, बबन नामदेव खेडेकर, मानसिंग भागवत खेडेकर , अरुण महाडिक शिक्षक, वाल्मीक भांडवलकर तलाठी कार्यालय वाघापूर गुरोली, बाळासो सिताराम खेडेकर, नवलू काळे, कांताराम महाराज खेडेकर, यास अनेक मान्यवर उपस्थित होते.समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ गुरूळी तसेच आयोजक, निमंत्रक, तबलावादक पेटी वादक तसेच टाळेकरी विणेकरी , पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन कैलास मठ, शिव मंदिर गुरु येथे करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *