एमएचटी सीईटी व नीट उन्हाळी वर्गासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन व ग्रंथालय सुविधा देणार .
![]()
एमएचटी सीईटी व नीट उन्हाळी वर्गासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती.
विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन व ग्रंथालय सुविधा देणार .
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- इंजिनिअरिंग, फार्मसी,तसेच कृषी पदवीसाठी यावर्षी 26एप्रिल पासून ऑनलाइन एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उन्हाळी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन नोबेल फाउंडेशन तर्फे 28 फेब्रुवारी ते 10 मे या काळात करण्यात आले आहे. यावर्षी नोबेल फाउंडेशन तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच शहरी भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात विनामूल्य भोजन व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन कमी खर्चात व गुणवत्तेचे मिळावे यासाठी नोबेल फाउंडेशन कार्यरत आहे.या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स विषयांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.ग्रामीण व शहरी गरजू विद्यार्थ्यांना भोजन आणि पुस्तकांची सुविधा साठीचा खर्च लोकसहभागातून उभारला जाणार आहे.
“खेड्यापाड्यातील विद्यार्थी बारावी नंतर दीड महिना शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांना भोजनावर खर्च होतो, सध्या हंगाम नसल्यामुळे शेतकरी पालकांकडे पैसे नाहीत विद्यार्थ्यांना भोजन सुविधा देऊन आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य पार पाडत आहोत तसेच सीईटी ची पुस्तके महाग असतात पालकांना पुस्तके खरेदी करण्याची आवश्यकता नसून विद्यार्थ्यांना सीईटी च्या संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालय 24 तास अभ्यासासाठी विनामूल्य दिले जाईल.”असे नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील यांनी सांगितले.
यासाठी लोकसहभागातून निधी उभारला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पालक व विद्यार्थ्यांनी नोबेल फाउंडेशन प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम शाळे समोर ख्वाजामिया दर्गा रोड जळगाव येथे संपर्क साधावा तसेच 9922004193 या क्रमांकावर नाव नोंदवावे.

