डॉ. सुनिकेश खैरनार याचे एम डी (जनरल मेडिसिन) मध्ये यश
1 min read

डॉ. सुनिकेश खैरनार याचे एम डी (जनरल मेडिसिन) मध्ये यश

Loading

डॉ. सुनिकेश खैरनार याचे एम डी (जनरल मेडिसिन) मध्ये यश

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील सौ सुलोचना व श्री नितल पुंडलिक खैरनार याचे चिरंजीव व मारवड महाविद्यालयातील प्रा डॉ. संजय शांताराम पाटील यांचे जावई डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञन विद्यापीठ, नाशिक अंतर्गत झालेल्या एम. डी. (जनरल मेडिसिन) परीक्षेत 800 पैकी 540 गुण मिळवून प्रथम श्रेणित यश संपादन केलेले आहे. त्यांचे एम बी बी एस चे शिक्षण मुंबई येथील गव्हर्मेंट नायर मेडिकल कॉलेजमधून झालेले असून, त्यांनी नुकतेच मुंबई येथील गव्हर्मेंट सायन मेडिकल कॉलेजमधून एम डी जनरल मेडिसिन ची पदवी प्राप्त केलेली आहे. आज समजात वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी पालकांमध्ये प्रचंड स्पर्धा लागलेली असून धनदांडगे आपल्या पैशांच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करताना दिसत आहेत. अशा स्पर्धेत एक रुपयाही खर्च न करता, एखादा तरुण, अभ्यास करून स्वकर्तुत्वाने जेव्हा शिक्षण घेऊन, समाजात आपले स्थान सिद्ध करतो हे चित्र आज फार क्वचितच बघायला मिळत आहे.
डॉ. सुनिकेश खैरनार यांचे सर्वात विशेष म्हणजे वडील चाळीसगाव येथे पोस्ट ऑफिस मध्ये असिस्टंट पोस्ट ऑफिसर असून आई गृहिणी आहेत. मोठे काका एरंडोल तालुक्यातील जळू जि प शाळेत प्रा शिक्षक आहेत व लहान काका सुरत येथे व्यावसायिक (इव्हेंट मॅनेजर) असून घरात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतील पार्श्वभूमी नसताना मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचे बालपण गेलेले आहे. कुठले महागळे कोचिंग न लावता घरच्या घरी कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वयंप्रेरणेने शिक्षण घेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च स्थान प्राप्त केल्यामुळे अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष व ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय आबासाहेब जयवंतराव पाटील यांनी त्यांचे मराठा समाजाच्या वतीने विशेष कौतुक करून, अभिनंदन केले. तसेच अमळनेर तालुक्यातून व संपूर्ण खानदेशातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *