प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR),पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न*
1 min read

प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR),पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR),पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न*
————————————————
अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान तर्फे प्रायोजित “बौद्धिक संपदा अधिकार,पेटंट व ट्रेडमार्क “या विषयावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पुणे येथील पेटंट चे कायदेशीर सल्लागार श्री.निलेश पंडित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवर अतिथींचा सत्कार आदरणीय प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए.बी.जैन याच्या हस्ते करण्यात आला.व्यासपीठावर सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष समन्वयक डॉ.मुकेश भोळे तसेच परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी उपस्थित होते.
प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली व अतिथींचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शशिकांत जोशी यांनी केले.
व्याख्यानाची अतिशय रंजक सुरुवात करून निलेश पंडित सरांनी विद्यार्थ्याना Invention आणि Discovery यातील फरक समजावून सांगितला.त्याचबरोबर कॉपीराईट,पेटंट व ट्रेडमार्क हे सर्व बौद्धिक संपदेशी संबंधित आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या उद्देशांबाबत व फायद्यांबाबत मनोरंजक उदाहरणांद्वारे उपयुक्त स्वरूपाची माहिती दिली.नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट घेता येते,त्याचे सर्व हक्क सरकार नोंदणीपासून 20 वर्षांपर्यंत त्या व्यक्तीला देते,त्यात कोणी बाधा आणली तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क त्या व्यक्तीस असतो.एखादा व्यवसाय सुरू करताना विशिष्ट नाव व चिन्ह तुम्ही वापरणार असाल तर त्याचे ट्रेडमार्क घेणे आवश्यक असते. जेणेकरून दुसऱ्याला ते वापरता येणार नाही त्यावर तुमचाच हक्क असतो.अशा विविध गोष्टींचे ज्ञान सरांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना अवगत करून दिले.
प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री निलेश पंडित सरांनी या क्लिष्ट विषयाला सुलभ स्वरूप देऊन खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांशी संवाद साधल्याचे नमूद केले व यापुढेही अशा अजून व्याख्यानासाठी येण्याचे आमंत्रण दिले.यावेळी सरांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

 

 

याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,
प्रा.डॉ.विजय तुंटे,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी माँटे,डॉ.योगेश तोरवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याच बरोबर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.नूतन बडगुजर,प्रा.नेहा महाजन,प्रा.केतकी सोनवणे व तंत्र सहाय्यक दिपक चौधरी यांनी सहकार्य केले.याप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तृतीय वर्ष व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *