आशा स्वयंसेविकांचे बेमुदत उपोषण स्थगित*  -गटविकास अधिकारी यांनी दिले संघटनेला लेखी पत्र
1 min read

आशा स्वयंसेविकांचे बेमुदत उपोषण स्थगित* -गटविकास अधिकारी यांनी दिले संघटनेला लेखी पत्र

Loading

आशा स्वयंसेविकांचे बेमुदत उपोषण स्थगित*

-गटविकास अधिकारी यांनी दिले संघटनेला लेखी पत्र

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती मीना दिनेश पाटील ह्या गेली अनेक वर्षे कार्यरत होत्या त्या त्यांचे काम इमाने इतबारे करीत होत्या.त्यांच्याबद्दल गावकऱ्यांची तसेच वरिष्ठांची कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती असे असताना ग्रामपंचायतीने दि.३०.०८.२०२४ रोजी अचानक ठराव करून त्यांना कामावरून काढून टाकण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पाठवला त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि.२३.०९.२०२४ रोजीच्या पत्रान्वये मिना पाटील यांना कायमस्वरूपी कामावरून कार्यमुक्त केले आहे.त्यामुळे गावातील नागरिक,गरोदर माता, स्तनदा माता, ह्या लसीकरण आणि आरोग्य सेवेपासून वंचित झाले आहेत.श्रीमती मीना पाटील यांना कामावरून कमी केल्याने यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर असून सूडबुद्धीने केलेला आहे. केलेली कार्यवाही मागे घेऊन सेवेत पुनः सामावून घ्यावे अशी वारंवार विनंती करूनही त्यांना कोणीही दाद दिली नाही.
श्रीमती मीना पाटील यांच्यावर कार्यमुक्तीची केलेली कारवाई तातडीने मागे घेऊन त्यांना पुनश्च सेवेत सामावून घेण्यात यावे.या मागणीसाठी मीना पाटील आणि त्यांचे कुटुंबीय तसेच संघटनेचे पदाधिकारी दि.२४ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती अमळनेर समोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता बेमुदत उपोषणास सुरूवात झाली.
सदर उपोषणाची दखल गटविकास अधिकारी श्री.एन. आर.पाटील यांनी घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण करून तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.गिरीष गोसावी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली.
सदर चर्चेत मिना पाटील आशा स्वयंसेविका यांच्या वर झालेल्या कार्यमुक्तीच्या कारवाईबाबत संबंधित ग्राम पंचायत कडून माहिती घेतली जाईल तसेच संघटना आणि संबंधित ग्राम सेवक तसेच सरपंच यांची लवकरच संयुक्त बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे संयुक्त लेखी आश्वासन संघटनेला दिले.
त्यामुळे बेमुदत उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. शिष्टमंडळात रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष सुनंदा पाटील,मिना पाटील,उषा पाटील, छाया पाटील यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *