“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!”
![]()
“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!”
अमळनेर प्रतिनिधी
शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील माजी विद्यार्थ्यी, उपक्रमशील, तंत्रस्नेही आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक सुधीर शांताराम चौधरी सर (उपशिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा तांदळी, ता. अमळनेर) यांनी ‘मराठी’ विषयात युजीसी नेट परीक्षा (Qualified for Ast. Professor & Ph.D.) उत्कृष्ट गुणांने उत्तीर्ण होऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून आणि मित्र परिवाराकडून ते अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्याची मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आली आहे. सुधीर चौधरी हा जिद्दी आणि चिकाटी असलेले कार्यतत्पर शिक्षक आहेत, त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन शारदा माध्यमिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक प्रा व्ही. एन. न्हावी सर आणि कळमसरे येथील तथा देवगाव देवळी हायस्कूलचे शिक्षक आय. आर. महाजन सर ,गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षणाविस्तराधिकारी सुर्वे मँडम,केद्रप्रमुख यांनी केले.

सुधीर चौधरी हे एक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक असून, शिक्षण= डी.एड, बी. ए. एम ए., बी.एड. एम.एड पुर्ण केले आहे.
त्यांनी तालुक्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रियतेने भाग घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण देणारे सुधीर सर यांचे अध्यापनाचे कार्य सचोटीने करीत आहेत, याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित करण्यात आले आहेत.
ते सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर शांताराम चौधरी यांचे चिरंजीव आहेत, तसेच मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एल. जे. चौधरी यांचे भाचे आणि प्राथमिक शिक्षक राकेश चौधरी यांचे भाऊ आहेत. सुधीर चौधरी सरांचे यश त्यांच्या कुटुंबासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी गर्वाची बाब आहे.

