“मृणालिनी दुसानिसने मंगळ ग्रह मंदिरात केली महाआरती!”
![]()
“मृणालिनी दुसानिसने मंगळ ग्रह मंदिरात केली महाआरती!”
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथे स्थित श्री मंगळ देव ग्रह मंदिरात आज अभिनेत्री मृणालिनी दुसानिसने भव्य महाआरती केली. झी मराठी वाहिनीवरील “माझिया प्रियाला प्रीत कळेना,” “तू तिथे मी,” “एका पेक्षा एक” आणि कलर्स मराठी वाहिनीवरील “अस्स सासर सुरेख बाई” या कार्यक्रमांमधील तिच्या भूमिकांमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
मंदिरात उपस्थित भाविकांना मृणालला पाहून आनंद झाला, आणि मंगळवारच्या निमित्ताने करण्यात येणारी महाआरती तिने खास साजरी केली. “हे अनुभव अगदी आगळा आणि वेगळा होता,” असे ती म्हणाली, “मंदिर आणि परिसर माझ्या मनाला खूप आवडला.”
मंदिराचे सचिव एस. बी. बाविस्कर, सौ. मंगल बाविस्कर, विश्वस्थ अनिल अहिरराव, दिलीप बहिरम, आणि सेवेकरी विनोद कदम आदींनी मृणालाचे स्वागत केले.
या खास प्रसंगामुळे मंदिर परिसरात उपस्थित भाविकांमध्ये उत्साह आणि आनंदाची लहर पसरली.


