“संत गाडगेबाबांचा महान संदेश: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती उत्साहात साजरी”
![]()
“संत गाडगेबाबांचा महान संदेश: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती उत्साहात साजरी”
अमळनेर प्रतिनिधी
संत गाडगेबाबा यांची जयंती पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आनंदात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनगिर येथील सेवानिवृत्त कंडक्टर श्रीराम माळी यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक युवा प्रदेश उपाध्यक्ष परीट धोबी समाजाचे दीपक वाल्हे यांनी केले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याबद्दल व्यापक चर्चा करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांना त्यांचे प्रेरणादायी कार्य स्मरणात राहिले.

या खास प्रसंगी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भिमराव जाधव , ईश्वर महाजन, दीपक वाल्हे, स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार , परीट समाजाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष उमेश वाल्हे, सचिव विजय वाघ, गंगाराम वाल्हे, दीपक वाल्हे, लक्ष्मण वाल्हे, अनिल वाघ ,लक्ष्मण परदेशी, मधुकर निंबाळकर,अमृत जाधव, मोतीलाल जाधव ,सतीश पवार व साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे
अनेक मान्यवर उपस्थित होते..
संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्वांचे मनोबल आणखी उंचावले गेले, आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा संदेश विशेष महत्त्वाने सर्वांसमोर आला.

