“छावा चित्रपटाची भव्य यशस्विता: धर्मवीर संभाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दाखवा!”  महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे निवेदन
1 min read

“छावा चित्रपटाची भव्य यशस्विता: धर्मवीर संभाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दाखवा!” महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे निवेदन

Loading

“छावा चित्रपटाची भव्य यशस्विता: धर्मवीर संभाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दाखवा!”

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, आणि या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारया या चित्रपटामध्ये त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची महत्त्वाकांक्षी कथा सादर करण्यात आली आहे.
संभाजी महाराजांनी स्वराज्य म्हणून कसे कार्य केले आणि आपल्या धर्मासाठी कसे बलिदान दिले, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा चित्रपट. या माध्यमातून मोठे आणि छोटे सर्वांना आपल्या खऱ्या इतिहासाची माहिती होईल, असे सौ. शुभांगीताई पाटील (संस्थापक तथा राज्याध्यक्ष, MTA) यांनी सांगितले.
याच उद्देशाने अमळनेर येथील प्रसिद्ध चित्रपटगृह एस.एस. सिनेप्लेक्सचे मॅनेजर श्री. संजय बजाज, सोमनाथ पाटील, नरेंद्र मराठे यांना निवेदन देण्यात आले, की शालेय गरीब विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये हा चित्रपट दाखवण्यात यावा.
हे करून विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागरूकता निर्माण करणे आणि एक उत्तम पिढी तयार करणे उद्देश आहे.
या निवेदनादरम्यान महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन जळगावचे कार्याध्यक्ष श्री. दिनेश साळुंखे, तालुका कार्याध्यक्ष श्री. संदीप पाटील,
सागर महाजन, आनंदा धनगर,जगन्नाथ पाटील,श्री.विनोद महाले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. ‘छावा’ चित्रपटामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *