अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…*
1 min read

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…*

Loading

*अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अँड ललिता पाटील, स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील प्रा देवेश्री पाटील शाळेचे प्राचार्य डॉ निरज चव्हान व प्रमुख वक्ते श्री अतुल डोळस सर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम अतुल डोलस सरांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन-चरित्रावर सुंदर व्याख्यान दिले. त्याच्या व्याख्यानाने सर्व शालेय वातावरण शिवमय झाले होते. नंतर पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका ज्योत्स्ना पाटील व समाजशास्त्र शिक्षक रविंद्र ठाकरे यांनी शिवरायांची महती त्यांच्या भाषणातून व्यक्त केली.
त्यांनंतर पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांच्या नृत्याने पूर्ण शालेय वातावरण भारावून गेले. त्यांच्या सुंदर नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते अतुल डोळस सरांचा सत्कार करण्यात आला. शिवरायांच्या जयघोषाने पूर्ण शालेय परिसर प्रफुल्लित झाला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. शाळेचे कीडा शिक्षक रमेश धनगर सर यांनी त्यांच्या लाठी-काठी प्रात्यक्षिकातून शिवकालीन युद्धकलेचे अप्रतिम दर्शन घडविले. अशाप्रकारे शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *