गरजूंना मदत करण्यातच खरे समाधान-डॉक्टर मुकेश पुरोहित
1 min read

गरजूंना मदत करण्यातच खरे समाधान-डॉक्टर मुकेश पुरोहित

Loading

गरजूंना मदत करण्यातच खरे समाधान… डॉक्टर मुकेश पुरोहित

अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुंउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात 30 अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन कीट देण्यात आले. या महिन्याचे दाता अमळनेर येथील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर मुकेश पुरोहित व त्यांच्या अर्धांगिनी प्रियंका पुरोहित तसेच ज्येष्ठ रोटरीन मकसुद भाई बोहरी हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोट्रियन अभिजीत भांडारकर यांनी प्रास्ताविक केले जात त्यांनी मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत दाते, व रोटरी आणि आधार परिवाराचे आभार मानले डॉक्टर मुकेश पुरोहित यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चांना फाटा देत सर्व मुलांना किराणा किट उपलब्ध करून दिले त्यांनी आपल्या मनोगता तून आज इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्याने मदत केल्याचे खरे समाधान मिळत आहे त्यामुळे योग्य ठिकाणी आणि गरजूंपर्यंत मदत करणे किती महत्त्वाचे आहे असे सांगितले. मक्सुद भाई बोहरी यांनी देखील मुलांशी संवाद साधला आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील व रोटरी प्रेसिडेंट तहा बुकवाला यांनी सर्व दात्याचे आणि मान्यवरांचे आभार मानले, रोटरी सदस्य , डॉ. अनिल वाणी, धीरज अग्रवाल , चेलाराम सैनानी, कीर्ती कुमार कोठारी ,महेश पाटील व आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील ,कार्यकारी संचालक रेणुप्रसाद उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधार संस्थेचे पुनम पाटील ,राकेश महाजन ,मुरलीधर बिरारी, दीपक विश्वेश्वर व त्तोसिफ शेख यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक संजय कापडे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *