संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया!
![]()
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील जीएम सोनार नगरातील प्रति शेगाव म्हणून ओळखले जाणारे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकट दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.
संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा २० फेब्रुवारी, गुरुवार रोजी अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात संपन्न होत आहे.
असा राहील कार्यक्रम
-सकाळी ६ ते ७: माऊलींचा अभिषेक व आरती
– सकाळी ८ ते १०: लघु रुद्र अभिषेक व पादुका पूजन (नितीन भावे गुरुजी यांच्या शुभ हस्ते)
– सकाळी १० ते ११: चक्रीय पारायण (सामूहिक)
– सकाळी ११ ते १२: माऊलींच्या सत्संग
-महाप्रसादाची वेळ-१२-३ पर्यंत..
सर्व बंधू-भगिनींनी माऊलीच्या दर्शनाचा व वरील सर्व कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार व महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी केले आहे.
ज्यांना गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळा निमित्ताने काही सेवा द्यायची आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष दिवशी सर्वांनी एकत्र येऊन माऊलीच्या आशीर्वादांचा लाभ घेऊया!

