लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा जादुई अनुभव; “सूनहरी यादे” कार्यक्रम अमळनेरमध्ये उद्या!
![]()
लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा जादुई अनुभव; “सूनहरी यादे” कार्यक्रम अमळनेरमध्ये उद्या!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील जुना टाऊन हॉल येथे उद्या, १८ तारखेला संध्याकाळी ७ वाजता “सूनहरी यादे” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारतरत्न, स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेता येणार आहे.
हा कार्यक्रम लाईव्ह म्युझिकवर असणार असून, सर्वांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. संगीत रसिकांना लता दीदींच्या अविस्मरणीय गाण्यांचा अनुभव घेण्यासाठी एक अद्वितीय संधी मिळणार आहे.
स्वरांजली म्युझिकल ग्रुपचे संचालक किशोर देशपांडे व मिलिंद पाटील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. संगीत क्षेत्रातील सर्व प्रेमींनी या एका खास संगीतिक प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्या अमर गीतांचे जादुई वातावरण अनुभवण्यासाठी या सुरेल सोहळ्यात सहभागी व्हा!

