सबगव्हाण येथील आशा स्वयंसेविका मिना पाटील यांना सेवेत पुनः सामावून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर दि.२४ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण…
![]()
सबगव्हाण येथील आशा स्वयंसेविका मिना पाटील यांना सेवेत पुनः सामावून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर दि.२४ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण…
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती मीना दिनेश पाटील ह्या गेली अनेक वर्षे कार्यरत होत्या त्या त्यांचे काम इमाने इतबारे करीत होत्या.त्यांच्याबद्दल गावकऱ्यांची तसेच वरिष्ठांची कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती असे असताना ग्रामपंचायतीने दि.३०.०८.२०२४ रोजी अचानक ठराव करून त्यांना कामावरून काढून टाकण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पाठवला त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि.२३.०९.२०२४ रोजीच्या पत्रान्वये मिना पाटील यांना कायमस्वरूपी कामावरून कार्यमुक्त केले आहे.त्यामुळे गावातील नागरिक,गरोदर माता, स्तनदा माता, ह्या लसीकरण आणि आरोग्य सेवेपासून वंचित झाले आहेत.श्रीमती मीना पाटील यांना कामावरून कमी केल्याने यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.ग्रामपंचायतीचा ठराव बेकायदेशीर असून सूडबुद्धीने केलेला आहे. केलेली कार्यवाही मागे घेऊन सेवेत पुनः सामावून घ्यावे अशी वारंवार विनंती करूनही त्यांना कोणीही दाद दिली नाही.
श्रीमती मीना पाटील यांच्यावर कार्यमुक्तीची केलेली कारवाई तातडीने मागे घेऊन त्यांना पुनश्च सेवेत सामावून घेण्यात यावे.या मागणीसाठी मीना पाटील आणि त्यांचे कुटुंबीय तसेच संघटनेचे पदाधिकारी दि.२४ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर यांच्या कार्यालयासमोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
उपोषण करण्याची वेळ येऊ न देता श्रीमती मीना पाटील यांना पुनश्च सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी श्री.पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

