जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास: नंदिनी डांगेची प्रेरणादायक यशोगाथा
1 min read

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास: नंदिनी डांगेची प्रेरणादायक यशोगाथा

Loading

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास: नंदिनी डांगेची प्रेरणादायक यशोगाथा

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव ता. अमळनेर येथे शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनी नंदिनी वसंत डांगेने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस म्हणून यश संपादन केले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असतांना नंदिनीने तिच्या आई-वडिलांना मदत करण्याचे ठरवले आणि नाशिकमध्ये एमआयडीसीमध्ये काम करून शिक्षणात आपल्या ध्येयाकडे पाऊल टाकले.
तिच्या मेहनतीला सिन्नर येथील ज्ञानदा अँकडमीतील मार्गदर्शक शिक्षक सुदाम शेळके यांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे ती थकवाटातून पुढे दोडून गेली. महात्मा जोतीराव फुले हायस्कूलने जिथे तिच्या जीवनाला दिशा दिली, तिथे तिने शाळेमध्ये येऊन आपल्या यशाची गोड बातमी शिक्षकांना कळवली.

 

 

 

 

 

 

 

नंदिनीने शाळेच्या परिसरात भेट देतांना उपस्थित शिक्षकांना प्रणाम केले आणि एच.ओ.माळी व आय.आर.महाजन यांनी तिचा पुस्तक देऊन सत्कार केला. तिला तसेच नंदिनीच्या मेहनतीचे कौतुक केले गेले आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे सांगितले.
तिच्या मनोगतात नंदिनीने स्पष्ट केले की, “मी एक स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. घरातील परिस्थिती जेमतेम होती, पण आई-वडील, भाऊ यांचा पाठींबा होता. मी आज पोलीस कॉन्स्टेबल झाले तरी मी थांबणार नाही; मी पीएसआय पद मिळवण्यासाठी अजून मेहनत करेल.”असे सांगितले..
तिचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले..

 

 

 

फोटो कँप्शन
“पोलीस कॉन्स्टेबल नंदिनी डांगे चा सत्कार करतांना शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एच.ओ.माळी, शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील,
माजी विद्यार्थिनीं नेहा पाटील, खुशी जाधव, अश्विनी पाटील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *