अनुकंपाचे वाली फक्त आणि फक्त कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत* *अनुकंपा तत्त्वावरील 129 वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मिळवून देणारे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे अनुकंपांचे कैवारी आहे अनुकंपांचा कुटुंबाचे देवदूत आहेत.*
![]()
*अनुकंपाचे वाली फक्त आणि फक्त कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत*
*अनुकंपा तत्त्वावरील 129 वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मिळवून देणारे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे अनुकंपांचे कैवारी आहे अनुकंपांचा कुटुंबाचे देवदूत आहेत.*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) अनुकंपाचे वाली फक्त आणि फक्त कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे*
अपेक्षित प्रमाणे सर्व शिक्षक भेटी करता आले होते खूप गर्दी होती, सर्वजण आप आपल्या समस्या मांडत होते एक एक शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या समस्यांचे निरासन करण्यास व्यस्त असताना त्यात अचानक आम्ही 2 तरुण मुले समोर आले, सर नमस्कार मी महेश गुरुनाथ भोईर आणि दुसरा मी श्रीधर सुनील वाकुर्ले संत सावळाराम विद्यालय ढोके तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे या शाळेतील आम्ही दोन शिपाई असून आमच्या अनुकंपा तत्त्वावरील वैयक्तिक मान्यता, आणि आपण मिळवून दिल्या आहेत आणि शालार्थ देखील आपण मिळवून दिलेला आहे, आज आमचा पहिला पगार आमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे, *त्यामुळे सर पहिल्या पगाराचा पहिला पेढा आपल्याला* देण्याकरीता आम्ही आलो आहोत *सर हा घ्या पेढा* करत आम्ही दोन्ही शिपायांनी अगदी आनंदाने आपल्या हक्काचे कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना पेढा दिला.
आमच्या डोक्यावरून वडिलांचे छप्पर हरवल्यानंतर आम्हाला कोणाचाही आधार नव्हता, सर आपण नसतात तर आम्हाला अद्यापही वैयक्तिक मान्यता ही मिळाली नसती आणि आमचा पगारही सुरू झाला नसता आपल्यामुळे आम्हाला सुखाचे दिवस आले आहेत, वडिलांच्या मृत्यूनंतर पहिलाच पगार आमच्या हातात आल्याने,आता आमचे कुटुंब स्थिरस्थावर होण्यासाठी, आमच्यासारख्या अनुकंपावरील संकटात असलेल्या लोकांचे आपण खरे मायबाप आहात, आपले आभार कसे मानावे हे कळत नाही सर पण आज आम्ही खूप खुश आहोत, आनंदी आहोत आमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे, आणि ते केवळ आपल्यामुळे शक्य झाले आहे असे म्हणत आम्ही तरुणांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार व्यक्त करत असताना जमलेल्या सर्व शिक्षकांमध्ये देखील आनंदाने वातावरण होते आम्ही निवडून दिलेला आमदार आमच्यासाठी किती तत्परतेने आणि प्रामाणिकपणे काम करत आहोत याची पोचपावती देखील जमलेल्या शिक्षकांना येत होती.
आजपर्यंत अनुकंपा तत्त्वावरील 129 वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मिळवून देणाऱ्यांपैकी आम्ही दोन शिपाई होते, आमचे कुटुंब उभा करण्याचे काम आमदार सरांनी केले त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात न मावळण्यासारखा होता, आज आम्ही अतिशय खुश आणि आनंदी होते.
महेश गुरुनाथ भोईर
श्रीधर सुनील वाकोरले
शिपाई
संत सावळाराम विद्यालय ढोके तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे.यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मुळे आम्हाला न्याय मिळाला आहे व हेच खरे अनुकंपांचे कैवारी आहेत या शब्दात हृदयापासून आभार मानले.

