कोनगाव पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी.* *घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना 24 तासात अटक.* *वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांची गुन्हेगारांवर वचक.*
![]()
*कोनगाव पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी.*
*घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना 24 तासात अटक.*
*वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांची गुन्हेगारांवर वचक.*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी मधील मॅक्सेल हिट एक्सचेंजर कंपनीतील 14 लाख 25 हजार एकशे चार किमतीच्या कोपर पाईप रोल चोरी करणाऱ्या चार सराईत अट्टल घरपोडी करणाऱ्या गुन्हेगारांना कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी तांत्रिक कौशल्य वापरून 24 तासाचां आत चोरीच्या कामासाठी वापरण्यात आलेला बोलेरो पिकअप मुद्देमालासह हस्तगत करून चार आरोपींना अटक करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे .
याबाबत कोनगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार, सरवली एमआयडीसीतील मॅक्सल हिट एक्सचेंजर कंपनीत रात्रीच्या सुमारास रनजीत रामनारायण यादव, मोहम्मद अब्रार नसीम शहा, शपातुल्लाह उर्फ इरफान इस्तियाक चौधरी, जबीउल्ला जुबेदउल्ला मलिक नामक चोरट्यांनी कंपनीचे शटर लगत असलेल्या लोखंडी दरवाजाच्या कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला व कंपनीमधील १४२५१०४ रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरून नेला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी वापरण्यात आलेली गाडी कोणत्या मार्गाने गेली त्या मार्गावातील सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर गाडीचा नंबर गाडी मालकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत सकल चौकशी केली सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तात्काळ या चारही आरोपींना कोनगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले व अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने ने केलेल्या बेधडकपणे व तत्पर केलेल्या कारवाईचे सर्व परिसरात कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

