अमळनेरला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप
![]()
अमळनेरला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रताप हायस्कूलमध्ये ११ फेब्रुवारी ते आज १५ फेब्रुवारी२०२५ शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप आज मोठ्या उत्साहात कुल क्रंमाक १ चा करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख अतिथी तज्ञ मार्गदर्शक सोपान भवरे,शरद पाटील,मुकेश पाटील, चेतन पाटील,
स्मिता वानखेडे, नेहा पाटील मँडम होत्या.
या प्रशिक्षणात अनेक शिक्षक सहभागी झाले व विविध शैक्षणिक कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले.
प्रशिक्षणाच्या या कार्यक्रमात निपुण प्रशिक्षकांनी मागील काही आठवड्यांमध्ये अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे तंत्र, तसेच डिजिटल साधनांचा Effective वापर यावर सत्रांचे आयोजन केले.
प्रशिक्षण वर्गामध्ये मार्गदर्शन करतांना अतुर्ली हायस्कूलच्या एम आर पाटील मॅडम , सानेगुरुजी शाळेच्या गीतांजली घोरपडे मँडम, माध्यमिक विद्यालय टाकरखेडा चे जगतराव पाटील सर यांनी “शिक्षकांच्या क्षमता वृद्धीवरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.”
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात यावर आधारित नव्या तंत्रांचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे. तज्ञ मार्गदर्शन यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करत शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे असे सांगितले.





नंतर तज्ञ मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला..
प्रशिक्षणाचे योग्य नियोजन करणारे देवेंद्र पाटील व प्रमोद पाटील यांचा पण सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुनील पाटील सर यांनी केले. कुल क्रमांक एक मध्ये पाच दिवसीय प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडले..यावेळी शिक्षक राजेंद्र पाटील,ईश्वर महाजन, सुनील शिंगाणे ,भरत पाटील,संदीप बोरसे,एस.टी.सोनवणे,विनोद पाटील, निलेश शर्मा,एच.ओ.माळी ,खंडारे सर ,मुरलीधर चव्हाण ,एन.डी.पाटील,शैला बैसाणे, मंगलप्रभा पाटील, पुनम साळुंके, आशा सोनवणेसह अनेक शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले..


