प्रताप कॉलेज आणि युनिक अकॅडमी,पुणे यांच्यात सामंजस्य करार* :
![]()
*प्रताप कॉलेज आणि युनिक अकॅडमी,पुणे यांच्यात सामंजस्य करार* :
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त),अमळनेर आणि युनिक अकॅडमी,पुणे यांच्यात दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सामंजस्य करार (MoU) झाला.प्रस्तुत सामंजस्य करार अंतर्गत प्रताप महाविद्यालयातील सर्व विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे,करियर कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने जे विविध उपक्रम, व्याख्याने, शिबिरे आयोजित केले जातील त्यामध्ये युनिक अकॅडमी, पुणे यांचा सहभाग व सहकार्य मिळणार आहे. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पर्यावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आह. वेळेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांनी केले जाईल, संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग परीक्षा अशा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या करारा अंतर्गत मार्गदर्शन मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांना वाचन साहित्य सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे, त्यांचे मॉक टेस्ट सुद्धा घेतले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना या दृष्टिकोनातून अधिकाधिक लाभ कसे मिळेल याचा प्रयत्न प्रताप महाविद्यालय व युनिक अकॅडमी, पुणे यांच्या द्वारे केले जाणार आहे.
प्रस्तुत सामंजस्य कराराचा कालावधी हा जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना या पद्धतीचे स्पर्धात्मक पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, डॉ.अनिल शिंदे, हरी भिका वाणी याच प्रमाणे संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, कुलसचिव श्री राकेश निळे,श्री.भटू चौधरी यांनी सहकार्य केले.
प्रस्तुत सामंजस्य करार करताना प्राचार्य डॉ.अरुण जैन,युनिक अकॅडेमीचे प्रमुख प्रा.तुकाराम जाधव,फार्मसीचे प्राचार्य डॉ.सोनवणे, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, करियर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील, डॉ व्ही बी मांटे, डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर,ग्रंथपाल दिपक पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.

