युनिक अकॅडमी”तर्फे आर्मी स्कूलला स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट…!_*
![]()
*_”युनिक अकॅडमी”तर्फे आर्मी स्कूलला स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट…!_*
अमळनेर प्रतिनिधी
> जळगाव येथील `युनिक अकॅडमी` तर्फे अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला `स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच` भेट देण्यात आला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांनी प्राचार्य विजय बोरसे सर यांच्याकडे पुस्तकांचा संच सुपूर्द केला. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक बी डी पाटील सर, सुभेदार मेजर श्रीराम पाटील सर आदी उपस्थित होते. दरम्यान आर्मी स्कूल मधील अकरावी- बारावीचे जे विद्यार्थी पोलीस भरतीची पूर्वतयारी करीत आहेत, त्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके फायदेशीर ठरणार आहेत. तसेच `’एनडीए’` च्या माध्यमातून लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या अगोदर ही युनिक अकॅडमी तर्फे वेळोवेळी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकांचा संच नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड सर यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. युनिक अकॅडमीचे युनिट हेड विकास गिरासे सर, समन्वयक नरेंद्र पाटील सर यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका ताईसाहेब शीलाताई पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, प्रा. शाम पवार सर आदींनी आभार व्यक्त केले आहेत.

