प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न* ———————————
1 min read

प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न* ———————————

Loading

*प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न*
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. ही शैक्षणिक सहल दि. ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केली होती. या शैक्षणिक सहलीत पदवी ते पदव्युत्तर या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अभ्यास दौऱ्यात विविध अभ्यासक्रमातील अभ्यास विषय असलेल्या लळिंग किल्ला, लांडोर बंगला, इतिहासचार्य वि.का.राजवाडे संशोधन केंद्र, धुळे व का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्था, धुळे या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास विषयाचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला. या सहलीमध्ये एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सहलीचा उद्देश मराठी भागातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या स्थळांना भेटी देऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले तसेच मराठी भाषेचा अभ्यास व संवर्धन करणारी का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्थेचा परिचय व त्याचे महत्त्व या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या सहलीचे समन्वयक प्रा.योगेश पाटील व सह- समन्वयक प्रा.प्रतिभा पाटील विभागप्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. रमेश माने, डॉ.विलास गावीत, प्रा. किरण पाटील आदींनी सहलीचे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *