ब्राम्हणवेल माध्य शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश “
![]()
“ब्राम्हणवेल माध्य शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश ”
साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै . बळीरामदादा माध्य. विद्यालय तर्फे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासनातर्फे घेण्यात आलेली राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एन एम एम एस परीक्षेत ब्राह्मणवेल येथील इ . आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले . या परीक्षेचा निकाल शेकडा ९० % इतका लागला आहे . या परीक्षेत कु . गौरव भाऊसाहेब तोरवणे रा . देवजीपाडा याचा प्रथम क्रमांक व कु . कामिनी गणेश सुर्यवंशी रा नागझिरी हिचा द्वितीय क्रमांक व सिध्देश मनोज शेवाळे रा देवजीपाडा याचा तृतीय क्रमांक विद्यालयात आला . या परीक्षेसाठी शासनातर्फे या परीक्षेतील राज्य स्तरीय मेरीट लिस्ट मधून निवडलेल्या मुलाला वार्षिक १२००० हजार रुपये शिष्यवृती मिळते . अशी शिष्यवृत्ती इ ९ वी ते १२ वी पर्यंत मिळते . या यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभागप्रमुख व वर्गशिक्षक श्री काशिनाथ माळी याचे मार्गदर्शन लाभले . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष श्री तुकाराम महाजन ‘ संस्था सचिव श्री . एकनाथ महाजन ‘ सर्व संचालक मंडळ ‘ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश माळी ‘ सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद आणि श्री भाऊसाहेब तोरवणे ‘ मनोज शेवाळे ‘ गणेश सुर्यवंशी ‘ छगन गावीत ‘ शरद कोरे ‘ इ . ग्रामस्थ मंडळी ब्राम्हणवेल आदी यांनी केले .🌹🌹

