सुधीर चौधरी यांचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक; आमदार व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाचा पुरस्काराने सन्मानित
![]()
सुधीर चौधरी यांचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक; आमदार व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाचा पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी
पंचायत समितिच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या 2024-25 शिक्षकांच्या स्पर्धेत उपक्रमशिल शिक्षक आणि जि.प. प्राथमिक शिक्षक तांदळीचे सुधीर शांताराम चौधरी यांनी सामूहिक सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सन्मान तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर पाटील, आणि पं.स. गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक बांधवांनी शिक्षक चौधरी यांना या अद्वितीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे शिक्षण क्षेत्रात प्रेरणा निर्माण झाली आहे, जे शिक्षण व सांस्कृतिक उपक्रमांच्या महत्त्वावर प्रकाश टाकते.
तालुक्यातील सर्व केद्रप्रमुख,
जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, शिक्षक मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.

