अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
1 min read

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Loading

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

3०/१/२५ रोजी अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली त्यानंतर अध्यक्ष तोलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला व अहवाल वाचन केले ,लीना ताई पाटील यांनी सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत भरली महिलांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या .२०१६ जानेवारीत मकरसंक्रांत हळदीकूंकुच्या कार्यक्रमापासुन या मंडळाची सुरूवात झाली. अध्यक्षा सौ. तिलोत्मा ताई पाटील यांच्या संकल्पनांतुन या मंडळाची सुरूवात झाली. त्यांना सौ. जयश्रीताई अनिलदादा पाटील, सौ. सुलोचनाचाई वाघ, सौ. सुनिताताई पाटील, सौ. अलकाताई पाटील, सौ. मंगलाताई पाटील, सौ भारती पाटील(आधार संस्था) ,सौ. शिलाताई पाटील,
सौ. कमलआक्का पाटील, सौ. प्रभाताई पवार,सौ. माधुरीताई पाटील, सौ. मनिषाताई पाटील, सौ. रागिणीताई पाटील, सौ. पद्मजाताई पाटील, सौ. भारती पाटील (भैरव), सौ. लीना पाटील या सर्वांची साथ लाभली. सुरूवातीला ५० सभासद पासुन आज ५०० सभासद झालेत. दर वर्षी हळदीकुंकूचा कार्यक्रमापासुन सुरुवात होते. महिला दिन , नवरात्र, कोजागरी असे पारंपरिक कार्यक्रम होतात तसेच व्यवसायाला चालना देणारे कार्यक्रम देखील होतात. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो तसे अनेक महिलांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *