यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
![]()
यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
आजचा दिवस म्हणजे तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा, कारण तुम्ही दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शिक्षणाने तुम्हाला चांगले वाईट याची जाण मिळवून दिली आहे, ज्यामुळे तुम्ही खूप काही शिकले आहात. आज तुम्हाला येथे स्वप्नांची गुंफण करायची आहे, कारण जिद्द व आत्मविश्वास हे तुमच्या यशाचे गुपीत आहेत.
तुम्ही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु मेहनत करणे हे अत्यंत आवश्यक आहे. यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये आहे. तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे, त्यासाठी तुमच्यातील जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव ता. अमळनेर येथे दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले

व्यासपीठावर डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाणचे प्राचार्य सत्यनारायण वैष्णव, कन्या शाळा चोपडा येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रवीण पाटील,संस्थेचे संचालक एन.जी.देशमुख, शिक्षक एच.ओ.माळी होते. अगोदर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. इयत्ता दहावीचे विद्यार्थिनी सोनाली महाजन, रागिणी पाटील, यश शिंदे पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर डी एस देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सत्यनारायण वैष्णव व सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रवीण पाटीलव शिक्षक एच.ओ.माळी यांनी
निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी सांगितले की या समारंभात बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले आहे, आणि हेच तुम्हाला भविष्यामध्ये आणखी मोठ्या कर्तबगारीकडे नेईल.
आणखी एक गोष्ट, तुमच्या यशाची कहाणी इथेच थांबणार नाही. आता तुम्हाला पुढील टप्प्यात प्रवेश करण्याची तयारी करावी लागेल. प्रत्येक अडथळा तुमच्यासाठी एक संधी असू शकतो, आणि त्याला सामना दिल्यास तुम्हाला खूप शिकता येईल.
आशा आहे की तुम्ही नेहमी प्रेरणादायक रहाल आणि तुमच्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल असे सांगत भरपूर मेहनत करा व आई-वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल करा असे सांगितले.
शाळेतील वर्षभरातील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, मेडल व रोख बक्षिसे देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते
सन्मानित करण्यात आले. दहावीचे विद्यार्थ्यांनी शाळेला चार घड्याळी मान्यवरांकडे सुपूर्त केली व विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त केले..
शाळेतील अहवाल वाचन व आभारप्रदर्शन स्काऊट शिक्षक एस .के महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजीराव पाटील ,गुरुदास पाटील, शालेय पोषण आहार प्रमुख कल्पनाताई पाटील यांनी प्रयत्न केले.


