वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग
![]()
वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ
जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वाचनने मला घडविले, मी लहाणपणी मुत्युंजय हे पुस्तक वाचले,वाचनाने मस्तक सशक्त होते.. सशक्त झालेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही.. आजच्या पिढीला या ग्रंथांचे ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे.
कोणत्याही गोष्टीला वयाचे बंधन नाही, आपण कोणत्याही वयामध्ये वाचनाचा छंद लावू शकतो.. मला आता सध्या संसदेमध्ये जातांना बराच वेळ मिळतो मी वाचनाची सवय लावून घेतली आहे..
पुस्तके हि तर आपल्याला दिशा देतात.. हा ग्रंथोत्सव कार्यक्रम अमळनेरला झाला आनंद वाटला..हा संदेश जिल्ह्यात जावा.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी माझ्या सरकारने न्याय दिला याचा मला आनंद आहे असे अमळनेर येथील जळगाव ग्रंथोत्सव पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय येथील कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष खासदार स्मिताताई वाघ बोलत होत्या..

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
खासदार स्मिताताई वाघ होत्या. तर प्रमुख अतिथी सुहास रोकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव,
डॉ डिगंबर महाले अध्यक्ष मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर,एफ.ए पठाण उपशिक्षणाधिकारी जि.प.जळगांव,युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी जळगांव..एस.डी पाटील जिल्हाध्यक्ष ग्रंथालय संघटना , सुनील जगताप जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिक,सानेगुरुजी वानालयाचे मा. अध्यक्ष वाचनालयाचे शामकांत भदाणे ,साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ होते.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव व पूज्य साने गुरुजी कडून यांच्या संयुक्त विद्यमान आणि जळगाव ग्रंथोत्सव 2024 साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय बस स्टँन्डच्या मागे अमळनेर जिल्हा जळगाव येथे शनिवार व रविवारी दोन दिवस आहे..
आज शनिवार आठ फेब्रुवारी ग्रंथ दिंडी सकाळी नऊ वाजता संत सखाराम महाराज संस्थान दिवाळी ग्रंथालय मोफत वाचनालय अमळनेर येथे ग्रंथ दिंडी पूजन शुभहस्ते आमदार अनिल भाईदास पाटील विधानसभा सदस्य अमळनेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एफ.ए. उपशिक्षणाधिकारी
माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव होते.
अमळनेर शहरातील अनेक शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. उत्कृष्ट लेझीम खेळत विद्यार्थीच्या शिस्तबद्ध ग्रंथ दिंडीने आजूबाजूचा परिसर दुमदुमला..
सुहास रोकडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव यांनी प्रस्ताविक करतांना सांगितले की वाचन प्रेमींना ग्रंथ उपलब्ध व्हावे यासाठी ग्रंथोत्सव घेण्यात आला आहे..
ग्रंथ वाचकापर्यत पोहचण्यासाठी ग्रंथालयाची जबाबदारी आहे. वाचकांचाही प्रतिसाद असणे गरजेचे आहे असे सांगितले.. सध्याही वाचन संस्कृती ही कमी होतांना दिसत आहे याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे असे सांगितले.
ग्रंथालय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रंथोत्सव अमळनेरला होत असल्यास मुळे आनंद व्यक्त करत अमळनेरला साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे ..सध्या ग्रंथालय संघटनेच्या व कर्मचाऱ्यांचे अनेक समस्या आहेत या समस्यांना खासदार स्मिताताई यांनी सोडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले तर उत्कृष्ट लेझीम पथक जय योगेश्वर माध्यमिक विदयालय यांना ग्रंथलाय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे 1000/ दिले तर
शिरसाळे माध्यमिक विदयालयाला
महेश पाटील, संदीप पाटील 1000 रूपये बक्षीस दिले. रोटरी क्लब च्या वतीने विद्यार्थ्यांना दिंडीमध्ये बिस्किट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले तर स्वादिष्ट नमकीन कडून पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधराताई दशरथ लांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी मानले. यावेळी ग्रंथोत्सव ग्रंथदिंडी मध्ये सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक मंडळ, स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव
अधिकारी व कर्मचारी वि भा. सोनवणे
तांत्रिक सहाय्यक ,शै प्र पाठक वरीष्ठ लिपीक, के च सोनार कनिष्ठ लिपिक
तु या राजपुत सह जिल्ह्यातील व तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर वाचनालय चे अध्यक्ष पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




