क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न*
![]()
*क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न*
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ द्वारा जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन *जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक* यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले .
प्रशिक्षण उदघाटन वेळी *श्री अनिल झोपे प्राचार्य* जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव हे अध्यक्ष स्थानी होते शिक्षकांनी क्रीडा प्रशिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधावा असे सांगितले व या नावीन्यपूर्ण उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभागी शिक्षकांचे कौतुक केले, *प्रमुख अतिथी श्री विकास पाटील* शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी खेळाकडून गुणवत्तेकडे विद्यार्थ्यांना न्यावे असे आपल्या मनोगतात सांगितले. क्रीडा कार्यालयातील श्री सुरेश थरकुडे व मिनल थोरात क्रीडा अधिकारी प्रसंगी उपस्थित होते. योग विषयक मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शिका *अनिता पाटील* यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासह शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त योग क्रिया करवून दाखवल्या. *श्री सत्यनारायण पवार* यांनी वॉर्म अप , फिटनेस ॲक्टिव्हिटी, कुलिंग डाऊन आदी विषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह करवून घेतले. शिक्षकांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. *श्री जयांशु पोळ राज्य सहसचिव महाराष्ट्र खो खो* असोसिएशन यांनी खो खो खेळ व नियमाविषयी मार्गदर्शन करताना प्राथमिक शाळांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी कृतिसह करवून दाखवल्या. श्री मिनल थोरात क्रीडा मार्गदर्शक सर यांनी खो खो खेळाचे मार्गदर्शन करताना विविध बाबी स्पष्ट केल्या.*श्री प्रशांत कोल्हे सर* यांनी कब्बडी खेळाचे नियम व डावपेचाचे मार्गदर्शन केले प्राथमिक स्तरावर कब्बडी साठी पूर्वतयारी कशी घ्यावी याची माहिती दिली. *श्री राजेश जाधव सर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स* असोसिएशन यांनी प्राथमिक साठी असणारे ॲथलेटिक्स चे इव्हेंट त्यांची मैदाने विविध स्पर्धा याविषयी मार्गदर्शन केले. *श्री सुरेश थरकुडे क्रीडा मार्गदर्शक* यांनी पूरक खेळ व मनोरंजक खेळ याचा प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकासासाठी कसा वापर करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमातील *प्रशिक्षणार्थींना स्नेह भोजन व्यवस्था महासंघ राज्य सदस्य श्री टि के पाटील सर* यांनी केली तर प्रशिक्षणासाठी साहित्य *श्री महेश पाटील सर ग स संचालक* यांनी उपलब्ध करून दिले .श्री अजित चौधरी , गोविंदा लोखंडे व गणेश लोडते सर यांचे ही आर्थिक सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे महासंघ ऋणी राहील. तसेच नियोजन व्यवस्थे साठी व पूर्वतायरी साठी श्री अशोक मदाने सर, देवेंद्र चौधरी, प्रफुल्ल सरोदे, निलेश मोरे, सुनिल पवार , शाकीर अहमद , सोमनाथ लोखंडे ,महेश तायडे, प्रमोद झलवार , मिलिंद नाईक , जितेंद्र झांबरे, प्रशांत आंभोरे , आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित चौधरी सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन निलेश मोरे, गणेश लोडते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.


