शाळेच्या बाल आनंद मेळाव्यात उत्साहाचा रंग: विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि सृजनशीलतेचा नवा अविष्कार राजर्षी शाहु प्राथमिक विद्याललयाचा उपक्रम
![]()
शाळेच्या बाल आनंद मेळाव्यात उत्साहाचा रंग: विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि सृजनशीलतेचा नवा अविष्कार
राजर्षी शाहु प्राथमिक विद्याललयाचा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राजर्षी शाहु प्राथमिक विद्यालय, अमळनेर येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा, मा. श्रीमती उषाताई नेतकर, उपाध्यक्षा, मा. श्रीमती रत्नमाला सोनवणे आणि खजिनदार, मा. श्री. चंद्रकांत नेतकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सौ. दिपाली मंगल भोई व लक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा, सौ. मनीषा नाना बोरसे यांनी देखील उपस्थिती देऊन या सुंदर कार्यक्रमाला महत्त्व प्रदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती उषा नेतकर मॅडम यांनी फीत कापून केले.
उपाध्यक्ष श्रीमती रत्नमाला सोनवणे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मुख्याध्यापिका सुनंदा पवार मॅडम आणि संपूर्ण शिक्षक वर्गाचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून आणले, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांची व पालकांची उस्फूर्त प्रतिसादाने कार्यकम यशस्वी झाला.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी नफा, तोटा, खरेदी-विक्री व संभाषण कौशल्य यासारख्या महत्त्वाच्या संकल्पनांना अधिक प्रभावीपणे आत्मसात केले.
हा बाल आनंद मेळावा शिक्षणात आनंद, सृजनशीलता आणि व्यवसायिक ज्ञान यांचे एकत्रीकरण करण्यात यशस्वी ठरला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे सामर्थ्य व कौशल्य अधिक उभारले गेले.

