आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन… अमळनेर समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन…
![]()
आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन…
अमळनेर
समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन…
अमळनेर – दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींची क्षेत्रकार्य भेटीचे आयोजन अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचे बुके देऊन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डी आर ढगे यांनी स्वागत केले. क्षेत्रकार्य भेटीचा उद्देश *प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितला. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विकास देवरे यांनी विद्यार्थिनींचा परिचय करून घेतला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे सर्वार्थाने कौतुक केले, युवतींसाठी एवढे सुंदर व्यासपीठ विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्याने त्यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना सांगितले की, FIR अर्थात फर्स्ट इन्फॉर्मेशन इन रजिस्टर म्हणजे काय? त्याचा काय उपयोग होतो, जातीय सलोखा राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांची माहिती दिली. सामाजिक उपक्रमांना परवानगी देण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. याची प्रक्रिया समजून सांगितली. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विद्यार्थिनींना माहिती सांगितले की, सामाजिक कायद्यांची अंमलबजावणी आणि त्या संदर्भात गुन्ह्याची नोंद करावयाची असल्यास आम्हाला आम्हाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत होते. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाईन कोणती पद्धती आहे. त्याची प्रक्रिया समजवून सांगितली. सार्वजनिक ठिकाणी असविधानिक कृती होत असल्यास, सामाजिक कार्यकर्ता म्हणून पोलिसांना इन्फॉर्म करू शकतात. यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक व कंट्रोल रूमचे क्रमांक विद्यार्थ्यांना दिले.
कौटुंबिक हिंसाचार कायदा, बालविवाह कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, रस्त्यावर होणारे अपघात, बाल लैंगिक शोषण, बाल तस्करी बाबत आवश्यक असलेली मदत, सामाजिक कार्यकर्ता म्हणून पोलीस प्रशासनाची मदत करू शकतात. असेही आव्हान केले. समाजात, प्रशासनात, राजकीय स्तरावर आणि कुठेही, कोणतीही अनुचित घटना घडली तर, सर्वात आधी पोलिस धावून जातात. कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन आपल्या परीक्षेत्रातील नागरिकांचे संरक्षण आणि त्यांचे संविधानिक हक्कांचे संरक्षण करतात. समाजकार्याच्या विद्यार्थिनी समाजातील समस्यांचे समूह उच्चाटन करण्यासाठी कार्य करावयाचे आहे. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनासोबत पोलीस मित्र म्हणून देखील काम करू शकतात. डिजिटल अटॅक, डिजिटल अरेस्ट, सायबर सेक्युरिटी, सायबर क्राईम, बँक फ्रॉड यासारख्या आर्थिक गुन्हा संबंधित घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. यासाठी पोलीस प्रशासनात सायबर क्राईम ब्रँच आणि आर्थिक गुन्हे शाखा या स्वतंत्र ब्रांचेस काम करत आहेत. याचीही माहिती विकास देवरे यांनी दिली.
सायबर क्राईम बाबत
अमळनेर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी संदीप धनगर, राहुल चव्हाण, सतीश पाटील यांनीही माहिती दिली.
सूत्रसंचालन दिव्या महाजन व आभार प्रदर्शन दामिनी पाटील यांनी केले.
क्षेत्र भेटीचे आयोजन, नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डी आर ढगे यांनी केले.


