आत्मनिर्भर युवती अभियान समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट
![]()
आत्मनिर्भर युवती अभियान
समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी विकास विभागांतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू च्या विद्यार्थिनींचे ग्रामीण रुग्णालय येथे हिमोग्लोबिन तपासणी करून विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहारा संदर्भात ग्रामीण रुग्णालयातील
डॉ. तनुश्री दामले व
डॉ शिरीन बागवान यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात सकस आणि पौष्टिक हिरव्या पाल्या भाज्यांचा समावेश करावा. कडधान्य प्रोटीन युक्त पदार्थ जेवणात यास नियमित व्यायाम योगासने करण्याचा सल्ला दिला. हिमोग्लोबिनची तपासणी लॅब टेक्निशियन श्री अमोल महाजन व आरोग्य कर्मचारी यांनी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना क्षेत्रकार्याच्या दुसऱ्या सत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती व्हावी म्हणून अमळनेर शहरातील आय.डी.एफ.सी. बँक येथे विद्यार्थिनींची विजिट करण्यात आली. बँकेचे व्यवस्थापक पुष्पेंद्र शर्मा यांनी बँकेचे व्यवहार कसे होतात, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी बँकेच्या माध्यमातून सेविंग खाते उघडले जातात. एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा बँकेकडून पुरविल्या जातात. त्याचबरोबर सेविंग खात्यातून परस्पर पैसे काढून घेऊ नये म्हणून * सिक्युरिटी की देखील त्यांनी सांगितल्या. ओटीपी शिवाय कोणताही ट्रांजेक्शन होत नाही, याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . बँक कोणत्याही खातेदाराला फोन करून केवायसी संदर्भात किंवा ओटीपी संदर्भात तसेच शिल्लक रक्कमे संदर्भात विचारात नाही. खातेदाराने बँकेच्या संदर्भात कोणतीही माहिती आवश्यक असल्यास, स्वतः बँकेत येऊन माहिती घ्यावी. बँक कुणालाही लिंक पाठवून माहिती भरण्याचा सल्ला देत नाही. अशा कोणत्याही अफवांना व लाभांना बळी पडू नये. विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांना शर्माजी आणि बँकेतील कर्मचारी चेतना पाटील व संघपाल झाल्टे यांनी मार्गदर्शन केले. आरटीजीएस, एनएफटी तसेच ऑनलाइन ट्रांजेक्शन, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, पर्सनल लोन, स्कॉलरशिप, अशा विविध सेवा सुविधां बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
संगणक, डिजिटल साक्षरता परिचय करणेसाठी विद्यार्थीनीना अमळनेर येथील सुनेट कॉम्प्युटर्स, स्टेशन रोड अमळनेर येथे क्षेत्र कार्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट देऊन सूनेट कॉम्प्युटरचे संचालक संजय पालकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सध्या आर्थिक व्यवहारांमध्ये होणारे सायबर फ्रॉड हा
सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं याविषयीची विस्तृत माहिती दिली. तसेच सेक्सटॉर्शन काय असते, ओटीपी फ्रॉड, चेहरा बदलून करून फोटो तयार करणे, चेहरा बदलून व्हिडिओ फोन करणे, पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या खोट्या धमक्या,
असे गंभीर विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
क्षेत्रकार्य भेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डी.आर. ढगे यांनी केले .महाविद्यालयातील IQAC समन्वयक प्रा. विजयकुमार वाघमारे ,आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य लाभले.


