विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत एलएलबी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन
1 min read

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत एलएलबी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन

Loading

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत एलएलबी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नुकत्याच झालेल्या डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये हजर राहूनही गैरहजर दाखवले गेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर काही विद्यार्थी नापास झाले आहेत. या निकालाच्या नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पेपरची फोटो कॉपी मागवली, तेव्हा आश्चर्यकारकपणे पेपराचे मूल्यांकन योग्यरितीने केले गेलेले नाही, असे समोर आले.
विद्यापीठाच्या या भोंगळपणामुळे विद्यार्थ्यांना अपार मनस्ताप सहन करावा लागतो आहे. फोटो कॉपी मागविण्यासाठी व पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना जवळपास दोन ते अडीच हजार रुपये खर्च यावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवरही गंभीर परिणाम होत आहे.
या समस्येविरूद्ध आवाज उठवण्यासाठी, आज एल एल बी च्या विद्यार्थ्याने कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसाठी आणि योग्य मूल्यांकनासाठी लढा दिला आहे.
विद्यापीठाच्या प्रशासनाने कोणतीही निर्णय न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *