नागपूर येथे’ मास्वे ‘ राष्ट्रीय परिषद,अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक व विदयार्थी सहभागी
1 min read

नागपूर येथे’ मास्वे ‘ राष्ट्रीय परिषद,अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक व विदयार्थी सहभागी

Loading

 

नागपूर येथे’ मास्वे ‘ राष्ट्रीय परिषद,अमळनेर येथील
समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक व विदयार्थी सहभागी

नागपूर येथे दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन “रिपब्लिक इंडिया @75 अँड बीयोंड” 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स अर्थात मास्वे चा तीस वर्ष पुर्ती समारंभ साजरा करण्यात येत आहे.
नागपूर येथील वानमती येथील वसंतराव नाईक स्मृति सभागृह येथे संपन्न होत आहे.

नागपूरच्या राष्ट्रीय परिषदेत अमळनेर जिल्हा जळगाव येथील प्राध्यापक व विदयार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बोलताना मुखयमंत्री प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय स्तरावर सोशल वर्क एज्युकेशन काऊन्सिल स्थापन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी अतिथी उपेंद्र कोठेकर, मुबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ राजन वेळुकर, सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव आर डी शिंदे, गांधी डॉस यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिव्या मुक्त समाज अभियान बोधचिन्ह अनावरण करण्यात आले,महाराष्ट्रातील पहिले शिव्या मुक्त गाव असा ठराव करणारे अहिल्यानगर जिल्हा, सौनदाळे
ग्रामपंचायत सरपंच शरद राव अरगडे यांच्या उपस्थितीमध्ये करणेत आले .
उद्घाटन प्रसंगी मासवे चे संस्थापक अध्यक्ष डॉ अंबादास मोहिते यांनी केले . सूत्र संचलन डॉ दीपक वलोकर यांनी केले.
या राष्ट्रीय परिषदेत अमळनेर येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा.डाॅ.भरत दशरथ खंडागळे यांचेसह 26 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आणि उपस्थितांची मन‌ं जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *