एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिशभाऊ ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड*
![]()
एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिशभाऊ ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड
जळगांव प्रतिनिधी
एरंडोल येथील १५७ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नगर वाचनालयाची आज दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष मा.किशोर काळकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते तथा संस्थेचे अध्यक्ष स्व.डॉ.वा.पु.जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील दिवंगतांना व कुंभमेळ्यात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर संस्थेचे ग्रंथपाल संतोष वंजारी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजूर केले.सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन वर्षासाठी सर्वानुमते एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठाकूर उर्फ जगदीशभाऊ ठाकूर यांची नगर वाचनालयाच्या अध्यक्षस्थानी,तर कार्याध्यक्षपदी खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे तर चिटणीसपदी निवृत्त शिक्षक तथा लेखक रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.याचवेळी सहचिटणीस यापदी संतोष वंजारी तर संचालकपदी मा.किशोरभाऊ काळकर,गुरुप्रसाद तुकाराम पाटील,जाधवराव भीमसेन जगताप,प्रवीण आधार महाजन, परेश किशोर बिर्ला, डॉ.प्रेमराज गंगाधर पळशीकर,अमोल अशोक काबरा, रवींद्र प्रभाकर सोनार,सुदर्शन मधुकर देशमुख यांची निवड करण्यात आली.
सभेचे संपूर्ण कामकाज ग्रंथपाल देवेंद्र संतोष वंजारी,लिपिक संजय बाळकृष्ण अग्निहोत्री,शिपाई गोकुळ अरुण मोरे यांनी केले.
नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करीत माननीय किशोरभाऊ काळकर यांनी बुके देऊन स्वागत केले.
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या सभेत मा.किशोरभाऊ काळकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले.नवनियुक्त अध्यक्ष जगदीश भाऊ ठाकूर ,कार्याध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांची मनोगते झाली.आभार प्रदर्शन सहचिटणीस संतोष वंजारी यांनी केले.

