धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या जुन्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी
1 min read

धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या जुन्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी

Loading

धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची
मागणी

धुळे प्रतिनिधी
आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री किशोरजी दराडे साहेब जोरा सिटी हायस्कूल, धुळे येथे शिक्षक दरबार प्रसंगी उपस्थित झाले. या यावेळी 2005 पूर्वी टप्पा अनुदान आणि 2005 नंतर 100% अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 1982 च्या जूनी पेंशन योजना लागू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील मान्यवर शिक्षकांमध्ये श्री पंडित पाटील सर, श्री सुनिल पाटील सर, श्री एन. एस. पाटील सर, श्री जितेंद्र पाटील सर, श्री स्वामी कुठे आणि इतर सर्व मान्यवरांचा समावेश होता. या कार्यकमाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005 पूर्वी) शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या वतीने हा महत्वपूर्ण मुद्दा उचला गेला आहे, ज्यामुळे शिक्षकांच्या पेंशन संदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *