मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन
![]()
मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मोबाईल विक्री-दुरुस्ती व्यापारी असोशिएशन ची महत्वाची बैठक भागवत रोड वरील भांडारकर कंपाऊंड शिवसेना कार्यालय चे पटांगण येथे रविवार दिनांक २फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.मोबाईल व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व्यापार शेत्रातील स्थिरता लक्षात घेता वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना संदर्भात विचार मंथन करून व्यापाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.या संदर्भात मोबाईल व्यापारी एकमेकांची भेट घेऊन अडचणी लक्षात घेत आहेत याकामी मोबाईल व्यापारी असोसिएशन चे अमित ललवाणी, प्रविण महाजन व पदाधिकारी व्यापाऱ्यांची प्रत्येक्ष भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.तरी सदर बैठकीस अमळनेर तालुका मोबाईल व्यापाऱ्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मोबाईल व्यापारी असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

