अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
![]()
अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
अमळनेर प्रतिनिधी
01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणूसाठी संबंधित ग्रामपंचायतींची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जिनमध्ये खडके, रणाईचे खु, दहिवद खु, लोण बु, कुन्हे खु, दहिवद, निसर्डी, मालपुर, रणाईचे बु, हिंगोणे बु, तळवाडे, लोणसिम व धार यांचा समावेश आहे.
दि. 30/01/2025 रोजीच्या सोडत सभेनुसार निश्चीत केलेले सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे:
– खडके – अनुसूचित जाती महिला,- रणाईचे खु – ना.मा.प्र.- दहिवद खु – ना.मा.प्र. महिला,- लोण बु – ना.मा.प्र. महिला,- कुन्हे खु – सर्वसाधारण,- दहिवद – सर्वसाधारण,- निसर्डी – सर्वसाधारण,- मालपुर – सर्वसाधारण,
– रणाईचे बु – सर्वसाधारण महिला,- हिंगोणे बु – सर्वसाधारण महिला,- तळवाडे – सर्वसाधारण महिला,- लोणसिम – सर्वसाधारण महिला आहे
सदर सभेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून मा. श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग, तसेच श्री. रुपेशकुमार सुराणा, प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार अमळनेर, श्री. प्रशांत धमके, निवडणूक नायब तहसिलदार, अमळनेर, श्री नितीन ढोकणे, महसूल सहायक उपस्थित होते. यावेळी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामस्थही उपस्थित होते.

