अमळनेरच्या शैक्षणिक परिसरात बुलेट स्वरांच्या त्रासाची समस्या!
1 min read

अमळनेरच्या शैक्षणिक परिसरात बुलेट स्वरांच्या त्रासाची समस्या!

Loading

अमळनेरच्या शैक्षणिक परिसरात बुलेट स्वरांच्या त्रासाची समस्या!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर मधील क्लासेस परिसरात बुलेट स्वरांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे जीवन अस्वस्थ झाले आहे. ग्लोबल स्कूल परिसर, कॉलेज रोड, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह परिसर, कोर्ट मागील भाग आणि पिंपळे रोड, मुंदडा विदयालय,जी.एस.हायस्कूल या ठिकाणी खासकरून बुलेट चालवणाऱ्या तरुणांनी गोंधळ निर्माण केला आहे.
बुलेटस्वरांची अनियंत्रित आवाज आणि रस्त्यावर उभे राहूण चालवले जाणारे वाहन यामुळे शाळा आणि महाविद्यालये यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वातावरणात एकाग्रता साधणे कठीण झाले आहे. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक याबद्दल चिंतेत आहे, कारण या आवाजामुळे त्यांच्या शालेय आणि शैक्षणिक कामात व्यत्यय येतो. येणाऱ्या
जाणाऱ्यांनाही रस्त्यातच गाड्या असल्यामुळे चालवणे कठीण होते त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी याबद्दल स्थानिक प्रशासनाकडे याकडे लक्ष घालावे व प्रभावी
उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विदयार्थ्याज व शैक्षणिक सामान्य जनतेने सजग राहून या समस्येवर लक्ष देणे गरजेचे आहे.
आवाजाचे प्रदूषण आणि रस्त्यावरच्या अनुशासनाच्या अभावी येणारे त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने यासंबंधी कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. अमळनेरच्या शैक्षणिक वातावरणाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासन, शाळा, महाविद्यालये, आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
अशी सध्या चर्चा सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *