“आदर्श शिक्षक” पुरस्काराने मिलिंद पाटील यांचा सन्मान!
1 min read

“आदर्श शिक्षक” पुरस्काराने मिलिंद पाटील यांचा सन्मान!

Loading

“आदर्श शिक्षक” पुरस्काराने मिलिंद पाटील यांचा सन्मान!

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षकाच्या कार्याचे खरे प्रदर्शन त्याचे विद्यार्थी आणि पालक वर्ग असतात, हे लक्षात घेता, लोंढवे येथील जेष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त गुरु निळकंठ तुळशीराम पाटील यांच्या तर्फे दरवर्षी दिला जाणारा “आदर्श शिक्षक” पुरस्कार यंदा स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मिलिंद प्रभाकर पाटील यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा वितरण समारंभ माजी आमदार डॉ. बि. एस. पाटील, निळकंठ तुळशीराम पाटील आणि मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांच्या हस्ते पार पडला. मान्यवरांमध्ये सरपंच सौ. भारती अशोक पाटील, उपसरपंच चतुर नवल पाटील, ग्रामसेवक देविदास माळी, पोलीस पाटील प्रभाकर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती विशेष ठरली.
शिक्षक मिलिंद पाटील यांना या सन्मानामुळे त्यांच्या शालेय आणि सामाजिक योगदानाची मान्यता मिळालेली आहे. समारंभाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या विकासात त्यांच्या योगदानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
या पुरस्काराने शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग ठरवला जात आहे. आपल्या कर्तृत्वाने या पुरस्काराला सार्थक करणाऱ्या मिलिंद पाटील यांचे कार्य शिक्षण समुदायाला एक नवा आदर्श देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिक्षक पत्रकार मिलिंद पाटील यांचे अभिनंदन व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, जिल्हाध्यक्ष संजय सुर्यवंशी व जिल्हा पदाधिकारी उमेश धनराळे, जयेश कुमार काटे सर,तालुका अध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष  जयवंतराव वानखेडे सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *