७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुलांची निवासी शाळा पारोळ्यात उत्सवाची धूम!
1 min read

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुलांची निवासी शाळा पारोळ्यात उत्सवाची धूम!

Loading

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुलांची निवासी शाळा पारोळ्यात उत्सवाची धूम!

अमळनेर प्रतिनिधी
– चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर संचलित निवासी शाळा पारोळा, जि. जळगांवमध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय डॉ. रानडे साहेब (वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय, पारोळा) यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष भारित केले. उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. जिनेंद्र पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, श्री. थोरात, श्री. भामरे, मोहम्मद खान, सलीम मुजावर, श्री. वाघ बाबा, आणि श्री. गणेश महाजन यांचा समावेश होता.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करून केली. विशेष शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या वेशभूषा सादरीकरण करून त्यांना अभिवादन केले.
शाळेच्या मुख्याध्यापक श्री. मनिष जाधव सर यांनी गाण्याद्वारे सर्व उपस्थितांचा उत्साह वाढवला, तर विशेष विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यामध्ये मान्यवरांना मानवंदना दिली. उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, शालेय साहित्य व खाऊ वितरित करण्यात आले.
सर्व उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांचे काम तसेच शाळेतील स्टाफच्या मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले
हा प्रजासत्ताक दिन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *