रयत इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा
![]()
रयत इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
🇮🇳 ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रयत इंटरनॅशनल स्कूल म्हाडा कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व शाळेचे संस्थापक अध्यक्ष भरत तिरमखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी शाळेतील मुलांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेतून भाषण केली , लेझीम पथक सादर केली , मिक्स देशभक्ती गाण्यावर मुलींनी नृत्य सादर केले.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुजा जाधव, रमेश सुरडकर,मेघा खैरे, वंदना पाटील, श्वेता देशमुख, आम्रपाली दांडगे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले व पालकांनी खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
विविधतेने नटलेला आपला देश एकसंघ ठेवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. यातूनच संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था देशात अस्तित्वात आली. गौरवशाली भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो आणि देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अखंड नांदत राहो, हीच शुभकामना देण्यात आल्या शेवटी आभार प्रदर्शन करून मुलांना फळ वाटप करण्यात आले.

