प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाँलीबाँल स्पर्धेचे भव्य आयोजन.
1 min read

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाँलीबाँल स्पर्धेचे भव्य आयोजन.

Loading

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाँलीबाँल स्पर्धेचे भव्य आयोजन.
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडी हिल्स फेज २ सोसायटीमध्ये आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हिंजवडी आयटी पार्कचे सरपंच गणेश भाऊ जांभुळकर, नेरे गावचे सरपंच सचिन जाधव, मनसेचे मुळशी तालुका उपाध्यक्ष गणेश शिंदे, कासारसाई गावचे माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. हिंजवडी हिल्स फेज २ सोसायटीचे चेअरमन राहुल कोतावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले , आमदार शंकर भाऊ मांडेकर आणि इतर मान्यवरांचे आभार मानले. शंकर भाऊ मांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

 

 

 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात हिंजवडी हिल्स फेज २ सोसायटीतील नागरिकांच्या वतीने आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा सत्कार बळीराम गोरे यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शंकर भाऊ मांडेकर यांनी स्वतः व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत जोमात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन हिंजवडी हिल्स फेज २ सोसायटी समितीच्या वतीने करण्यात आले होते. आयोजनामध्ये चेअरमन राहुल कोतावडे, सेक्रेटरी दीपाली वाघमोडे चोरमल, खजिनदार देवेंद्र कोरे, समिती सदस्य प्रसाद कोल्हटकर, कमलेश मनीखेडकर, विल्सन खाडे, सर किशोरी कुलकर्णी तसेच सोसायटीतील धडाडीचे कार्यकर्ते बळीराम गोरे सर, बंकट चोरमल, पंकज पाटील, अमोल कथलकर, सागर खोंड, अल्केश भोई, शोबित मोहन इत्यादींनी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.क्रीडाप्रेमी नागरिक व पुणेकरांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *