महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !…
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग नववीत प्रथम येणारी विद्यार्थिनी कु.चेतना जावरे हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शहरात रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला सर्व शिक्षक बंधु -भगिनी यांसह विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. प्रजासत्ताक दिनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. या मुलींना मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, माजी मुख्याध्यापक एम के महाजन, एस डब्ल्यू पाटील, माजी क्रीडा शिक्षक व्ही पी महाले, सुखदेव महाजन, मोतीलाल महाजन, गोपाल महाजन, के आर वाघ सर, राजेंद्र चंद्रकांत जावरे तसेच सामाजिक , शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व पालक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.


