उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयात अमळनेरला मतदार दिवस कार्यक्रम संपन्न
![]()
*राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम*
प्रतिनिधी : भुषण महाजन
आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम, अमळनेर येथील माननीय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी
रांगोळी स्पर्धा,
पोस्टर/ चित्रकला स्पर्धा
पथनाट्ये सादरीकरण
श्रमदान मोहीम
असे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, रूक्मिणी ताई महिला महाविद्यालय,
प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील विद्यार्थी सहभागी होते.
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यानी परिसरात श्रमदान मोहीम राबविली. याप्रसंगी समाज कार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी आणि टीम यानी पथनाट्य सादर केले.
महिला महाद्यालयाच्या टीम ने पथनाट्य सदर केले.
प्रांत अधिकारी नितीशकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसिलदार धमके, नितीन ढोकणे यांचेसह कर्मचारी यांनी उपस्थिती होती. सहभागी सर्व विदयार्थी, प्राध्यापक यांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. सदर कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ पी एस पाटील यांचे कडून मार्गदर्शन लाभले.
यशस्वीतेसाठी डॉ अनिता खेडकर, डॉ भरत खंडागळे, प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा डी आर ढगे यांनी समन्वय साधून कार्यक्रम संपन्न करणेत आला.
सहभागी विद्यार्थ्याना प्रोत्साहन म्हणुन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

