होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर संपन्न
1 min read

होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर संपन्न

Loading

होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर संपन्न

ठाणे:कल्याण
( मनिलाल शिंपी)होली क्रॉस हायस्कूल कल्याण पूर्व मधील होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल चा गावदेव खर्डी गाव मलंगगड रोड कल्याण ईस्ट येथे होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूल स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा एक दिवसीय निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रमूख पाहुणे म्हणून कल्याणचे भारत स्काऊट गाईड सचिव श्री. शशिकांत पाटील, ट्रेनिंग कौन्सिलेशन श्री.प्रवीण खाडे यांनी शिबिराला भेट देऊन स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी उभारलेले तंबू निरीक्षण केले तसेच विवीध प्रकारचे गॅझेट, तंबू सजावट बघून समाधान व्यक्त केले. तसेच स्वतः स्काऊट यांनी केलेल्या स्वयंपाकाचा प्रमूख पाहुण्यांनी आस्वाद घेउन आनंद व्यक्त केला. त्यानंतर या शिबिरात झालेले कार्यक्रम, शेकोटी कार्यक्रम ,सहल, बीपी सिक्स एक्सरसाइज , मेडिटेशन, योगा घेण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री.अर्जुन नायर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. शशिकांत पाटील, प्रवीण खाडे यांनी उपस्थित स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शशिकांत पाटील सरांनी मुलांना आरोळ्या आणि स्काऊट गाईडच्या क्लॅप ऍक्टिव्हिटी घेऊन मुलाचे प्रोत्साहन वाढवून मार्गदर्शन केले .त्याच बरोबर मुलांना पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

शिबिराचा शेवट भारत स्काऊट गाईड झेंडा गीताने करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री.अर्जुन नायर, उपाध्यक्ष मिस अश्विती नायर, खजिनदार सौ.मनीषा नायर, मुख्याध्यापक सौ यशोदा नाईक, सुपरवायझर सौ.ज्योती दुबे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट श्री.शरद सर, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. तसेच कार्यक्रमाला साथ देणारे प्रतिभा मिस ,सरिता मिस, सिद्धार्थ सर, अनुराग सर ,यांनी स्काऊट गाईडच्या कॅम्प कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन स्काउट मास्टर विजेता रहाटे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *