‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी!
![]()
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी!
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी(अमोल बैसाणे)
शिंदखेडा-पाष्टे – महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमास 22 जानेवारी रोजी 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बालविकास विभागातर्फे गावात जनजागृती व फेरी घेण्यात आली. या खास दिंवशीस समर्पित 8 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याच्यामध्ये 24 जानेवारी 2025 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1- शिंदखेडा कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ याबाबत शपथ घेतली.
या कार्यक्रमात प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एन. टी. पावरा, पर्यवेक्षिका श्रीमती आर. वाय. कोळी, एस. एस. पाडवी आणि गावातील अंगणवाडी सेविकांसह जि. प. शाळेचे शिक्षक व गावातील मुले व महिलांनी भाग घेतला.
या उपक्रमा अंतर्गत महिलांच्या शिक्षण व सुरक्षा याबाबत जागरूकता वाढवण्याचा मुख्य उद्देश्य साधण्यात आला आहे!

