उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण. युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध
![]()
उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण.
युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध
जळगाव – महाराष्ट्र शासनातर्फे भविष्यातील राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे. या पोलीस भरतीच्या मैदानी सरावाबाबत तसेच लेखी परीक्षेबाबत शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे सदरक्षण पोलीस भरती प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत तीन तुकडी प्रशिक्षण संपन्न झाले असून चौथे प्रशिक्षण वर्ग एक मे पासून सुरू होत आहेत. या अंतर्गत दिनांक २५ ते २७ जानेवारी रोजी निशुल्क सेमिनार व निवड प्रक्रिया सकाळी दहा ते एक या वेळात नोबेल फाउंडेशनच्या सभागृहात प्रगती शाळेसमोर संपन्न होणार आहे. सदर प्रशिक्षण वर्ग २८ जानेवारी पासून सुरू होत असून उमेदवारांना अभ्यासिका ,ग्रंथालय तसेच सराव परीक्षा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.तसेच विनामूल्य मैदानी प्रशिक्षण संपन्न होणार आहे. तरी युवक व युवतींनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक जयदीप पाटील यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9922004193 येथे संपर्क साधावा.

