राज्यघटना या देशाचा ग्रंथ- पीएसआय प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन
1 min read

राज्यघटना या देशाचा ग्रंथ- पीएसआय प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन

Loading

राज्यघटना या देशाचा ग्रंथ- पीएसआय प्रमोद वाघ यांचे प्रतिपादन
———————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात रुसा,अंतर्गत अभिवचन हमी कक्ष, करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवशीय सामान्य ज्ञान मार्गदर्शन कोर्सचेच्या निमित्ताने आज सहाव्या दिवशी युनिक अकॅडमीचे प्रमोद वाघ यांनी भारतीय संविधान यावर अभ्यासपूर्ण असे व्याख्यान विद्यार्थ्यांना दिले. प्रमोद वाघ आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात असे म्हणाले की, भारताचे संविधान किंवा राज्यघटना या देशाला मिळालेली फार महत्त्वाची एक महत्वाची बाब आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी परिश्रमपूर्वक संविधानाचे लेखन करून संबंध भारतीयांना अधिकार बहाल केले, राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास, राज्यघटनेत असणाऱ्या विविध कलमाचा अंतर्भाव यासंदर्भाचे विवेचन करताना अलीकडील काळात जनहित याचिका व समान नागरी संहिता या अद्यावत बाबींचा अंतर्भाव हा समाजाच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे ? याची सूक्ष्मतवाने मांडणी प्रमोद वाघ यांनी केली. त्यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की, राज्यशास्त्र व प्रशासन याचा याच्या अभ्यासाशिवाय स्पर्धा परीक्षा अपूर्ण आहे म्हणून उद्देश पत्रिका, राज्यघटनेचे महत्त्व या सर्व बाबींची तपशीलवारपणे मांडणी केले.
या प्रसंगी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे डॉ. विजय तुंटे, डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर, प्रा.वृषाली वाकडे ,ग्रंथपाल दीपक पाटील,प्रा.दिलीप तडवी,प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.सचिन आवटे,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी हे यावेळी उपस्थित होते.
प्रस्तुत मार्गदर्शन प्रक्रियेत दिलीप शिरसाट, पराग पाटील,विशाल अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी व्याख्यातांचा परिचय डॉ.जितेंद्र पाटील यांनी करून दिला.याप्रसंगी 80 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *