विलासराव पाटील यांची अ भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्निवड: खान्देशवासियांचा गौरव
1 min read

विलासराव पाटील यांची अ भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्निवड: खान्देशवासियांचा गौरव

Loading

विलासराव पाटील यांची अ भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्निवड: खान्देशवासियांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खान्देश विकास फोरमचे अध्यक्ष, म. फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि ओबीसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांची पुणे येथील अ भा माळी महासंघाच्या विश्वस्तांची बैठक संपन्न झाली. या बैठकात सर्व सदस्यांनी एकमताने व बिनविरोध त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्याचा ठराव केला.
या महत्वपूर्ण घटनेबद्दल खान्देशवासीयांनी अभिमान व्यक्त केला असून, हा निर्णय त्यांच्या कार्याच्या गौरवाची व सामाजिक प्रतिष्ठेची पावती आहे. निवडीनंतर, पाटील यांचा विशेष सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला, ज्यात अ भा. माळी महासंघाचे महानगराध्यक्ष हरीशचंद्र रेंडे, महानगर कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र गवळे, महानगर मोगलाई विभाग प्रमुख बापू महाजन, राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव काशिनाथ माळी, कर्मचारी विभाग प्रमुख राजेंद्र माळी, महानगर सचिव ज्ञानेश्वर माळी, कर्मचारी उपाध्यक्ष संदीप माळी पदाधिकारी भरत माळी आणि महानगर युवाध्यक्ष जयेश माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी विलासराव पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या नेतृत्वात महासंघाला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त केली. खान्देशातील माळी समाजाच्या विकासासाठी त्यांचं कार्य निश्चितच प्रेरणादायक आहे, आणि या सत्कारामुळे त्यांच्या योगदानाला खरा मान मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *