मुंबई महानगरपालिका जी.उत्तर विभागाच्या धारावी स्थित संगम प्रतिष्ठान कार्यान्वित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावरील सिटी कंपोस्ट/ खत प्रकल्पातील खत वितरण उपक्रम यशस्वी**
![]()
**मुंबई महानगरपालिका जी.उत्तर विभागाच्या धारावी स्थित संगम प्रतिष्ठान कार्यान्वित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावरील सिटी कंपोस्ट/ खत प्रकल्पातील खत वितरण उपक्रम यशस्वी**
.मुंबई( विशेष प्रतिनिधी उदय नरे)
संगम प्रतिष्ठान या पर्यावरण संवर्धन विषयावर कार्यरत संस्थेने स्वच्छता पंधरवड्यात सुरू केलेल्या खत प्रकलपातून चार महिन्यात सुमारे दोन टन सिटी कंपोस्ट/ खत तयार झाले असून यापैकी एक टन खत स्थानिक नागरिक आणि पर्यावरण मित्रांना दान करण्यात आले असून,उर्वरित एक टन खत सेवाभावी संस्था,मनपा उद्यान आणि पर्यावरण मित्रांना देण्याचे काम सुरू आहे.
दान हे सत्पात्री असावे असे म्हटले जाते,तद्वतच आज दिनांक 9 जानेवारी रोजी हायड्रोलिक विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.नागेश धोंगडे साहेब यांच्या सह दुय्यम अभियंता श्री.अभिजित देसाई तसेच मनपा जी उत्तर विभागाच्या घन कचरा विभागाचे दुय्यम अभियंता समीर धामणस्कर,श्री.राठोड,गडारी,यांनी वर्गीकरण केंद्रास भेट दिली.त्यावेळी संगम प्रतिष्ठान च्या सचिव कोमल घाग यांनी सर्व उपस्थितांना संस्थेचे शुभचिंतक सेवानिवृत्त मनपा अधिकारी तानाजी घाग यांच्या हस्ते सिटी कंपोस्ट देवून उपकृत केले.यावेळी उपस्थितांनी संस्थेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.

